घाटमाथा
महाराष्ट्राला दगडांचा देश असे म्हटले गेले आहे, त्याला कारणही तसेच आहे. सह्याद्री, सातपुडा, बालाघाट यांच्या सारख्या विशाल पर्वत रांगा, असंख्य दुर्गम, दुर्लघ्य किल्ले, अनेक थंड हवेची ठिकाणे अशी विविधता आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते.
सह्याद्री पर्वत रांगेच्या पश्चिमेला असलेल्या भूभागाला आपण कोकण म्हणून ओळखतो. भगवान परशुरामाने ही भूमी तयार केली अशी पौराणिक कथा सांगितली जाते.
सहयाद्री पर्वत चढून आपण वर आलो की आपण घाटमाथ्यावर येतो. सहयाद्री पर्वताची सरासरी उंची आहे अडीच हजार ते साडेतीन हजार फूट, सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई त्याची उंची साडेपाच हजार फूट आहे. कळसुबाई हे शिखर बालाघाट डोंगररांगेत आहे. तसेच हरिश्चंद्र, आजोबा डोंगर,अलंग, कुलंग, मदन असे विशालकाय शिखर या रांगेत आहेत. महाराष्ट्रात ट्रेकिंग, फोटोग्राफी तसेच निसर्गाची आवड असलेली भटकी मंडळी आपल्याला या भागात फिरतांना आढळतात.
सह्याद्रीतील बहुतेक घटमाथे हे किल्ल्यांनी तसेच थंड हवेच्या ठिकाणांनी सजलेले आहेत. या प्रत्येक डोंगर माथ्यावरून आपल्याला अतिशय नेत्रसुखद असे दृश्य पाहायला मिळतात. पावसाळ्यात तर इथल्या निसर्ग सौंदर्यात विलक्षण भर पडून आपल्याला इथल्या निसर्गाची भुरळ पडते. सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली असते. मधेच धुकं बाजूला होऊन या डोंगरांवरून वाहणारे दुधाळ धबधबे आपल्याला दर्शन देतात.
डोंगरमाथ्यावर किंवा घाटमाथ्यावर जाण्यासाठी असलेले प्राचीन घाटमार्ग सुद्धा आकर्षणाचे विषय आहेत. पूर्वीच्या काळात भारतीय व्यापाऱ्यांचे परदेशातील लोकांशी जे
व्यापार चालत ते बहुधा समुद्रमार्गानेच चालत असत आणि मालाचं दळणवळण करण्यासाठी काही घाटमार्ग तयार केलेले असत. त्या घाटमार्गाच्या मदतीनेच बंदरातील माल देशावरील पैठण, जुन्नर सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवला जाई. कोकणातून देशावर जाणाऱ्या घाट मार्गात प्रामुख्याने बोरघाट, थळघाट, माळशेज घाट, वरंधा घाट, आंबेनळी घाट, नाणे घाट हे आहेत. या पैकी बरेचशे पायवाट म्हणून सुद्धा देशावरून कोकणात किंवा कोकणातून देशावर जाण्यासाठी वापरत.
👍🏻👍🏻
उत्तर द्याहटवाखूप 👍👍👍👍👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवासुंदर लेख
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद
हटवावन्यप्रेमी अक्षय हेलंडे मस्त लिहिलंय 👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद...
हटवाअप्रतिम 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा,👍
उत्तर द्याहटवा