Wikipedia

शोध परिणाम

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०

झाडे आपल्या आसपास असणारे असे सजीव ज्यांच्या अस्तित्वामुळे आपण श्वास घेऊ शकतो. खरतर झाडे आहेत म्हणूनच आपण, हि जीव सृष्टी आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात जेवढ्या गोष्टी लागतात त्या सर्व झाडे आपल्याला पुरवतात. पण आपण मात्र कसलाही विचार न करता बेसुमार वृक्षतोड करतो. मागच्या काही काळात मानवाने इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे आणि अजूनही करतच आहे, परंतु याचे भयंकर गंभीर परिणाम मानवासोबत सर्व जीवांना भोगावे लागत आहेत. वातावरणावर याचे विपरीत परिणाम होऊन पृथ्वीचा समतोल ढासळलेला आहे.

प्रकाश संश्लेषण क्रियेच्या मदतीने झाडे आपलं स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. जमीनिकडून पाणी, हवेतून कार्बन डायओक्साइड घेऊन प्रकाशच्या मदतीने हे अन्न बनवण्याच काम निरंतर चालू असतं. या सर्व क्रियेतून झाडाच्या प्रत्येक पांनाकडून आपल्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन आपला प्राणवायू आपल्याला विनामूल्य मिळत असतो. पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन ७८%, ऑक्सिजन २१%, आर्गोन ०.९%, कार्बन डायओक्साइड ०.०३% आर्द्रता आणि इतर वायु ०.०७%  आहेत. वाढत्या औद्योगीकरणामुळे वातावरणाचा समतोल ढासळत नव्हे तर ढासळलेला आहे.त्याचा परिणाम आपल्याला ऋतूमानावर सुद्धा दिसून येतो. प्रत्येक माणूस त्याच्या दैनंदिन हालचालींमधून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या प्रदूषण करतच असतो. वाढत्या लोकसंख्येमुळे या पर्यावरणाबाबतच्या समस्या भविष्यात उग्र स्वरूप धारण करतील, जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करणारे कवच म्हणजेच ओझोन वायूच्या प्रमाणात सुद्धा घट होते आहे. क्लोरोफ्लूरोकार्बनमुळे  आपण आपलच भविष्य धोक्यात आणतो आहोत.

या भविष्यात मोठा स्वरूप होणार्‍या समस्येवर आपण सर्वांनी वेळ असतांनाच उपाय योजना करायला हवी आहे, समाजात राहणार्‍या प्रत्येक माणसाने निसर्गप्रती प्रेम दाखवून या समस्येविरुद्ध वैयक्तिकरित्या काही तरी करणे अपेक्षित आहे. वृक्षारोपण हा या समस्येवर तोडक उपाय आहे कारण वृक्ष वातावरणातील कार्बन मोठ्या प्रमाणात शोषून घेऊन आपल्या ऑक्सिजन पुरवतात. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने आपण राहतो त्या ठिकाणी आजूबाजूला जिथे योग्य जागा भेटेल अशा ठिकाणी कमीत कमी पाच झाडे तरी लावून त्यांची जोपासना केली पाहिजे.रस्त्याचा दुतर्फा, शाळेच्या आवारात, हॉस्पिटलच्या आवारात, सरकारी इमारतींच्या आवारात, शक्य असेल तर खासगी जागेत सुद्धा परवानगीने  झाडे लावली पाहिजेत.

आपल्या पुढील ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत की आपण वृक्षारोपण करताना कोणतीकोणती झाडे लावयला पाहिजेत. 

भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आ...